www.24taas.com, आग्रा
जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असलेला आणि भारताचा मानबिंदू असलेला 'ताजमहाल' धोक्यात आला आहे. ताजमहालाचा एक मनोरा गेल्या काही वर्षांमध्ये झुकत असल्याचं प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागानं सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे.
गेल्या ३० वर्षात ताजमहालचा एक मनोरा ३.५७ सेंटीमीटर झुकल्याचं पुरातत्व विभागानं या प्रतिज्ञापत्रात मान्य केलं आहे. यापूर्वीही वाढत्या प्रदूषणामुळं ताजमहालाला धोका निर्माण झाल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र आता पुरातत्व विभागानं प्रतिज्ञापत्रात हे मान्य केल्यानं सुंदर ताजमहालाचं अस्तित्व धोक्यात आल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आणि जगभरातल्या पर्यटाकांचं आकर्षण असलेल्या ताजमहालाच्या सौंदर्याला धक्का लागू नये, याची दक्षता घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.