बेळगाव पालिका कर्नाटकने केली बरखास्त

मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारने आज बेळगाव महापालिका बरखास्त केली. महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. ही घोषणा कर्नाटकचे नगरविकासमंत्री सुरेश कुमार यांनी राज्य विधानसभेत केली

Updated: Dec 17, 2011, 08:48 AM IST

झी २४ तास वेब टीम, बेळगाव

 

मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारने आज बेळगाव महापालिका बरखास्त केली.

 

महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. ही घोषणा कर्नाटकचे नगरविकासमंत्री सुरेश कुमार यांनी राज्य विधानसभेत केली. राज्य शासनाच्या या कृतीतून मराठीविरोध पुन्हा एकदा दिसून आला आहे. या निर्णयावर सीमाभागातील मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

कर्नाटक विरोधातील मोर्चा मराठी गटातील महापौर आणि उपमाहपौर सहभागी झाल्याने राज्यविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत बेळगाव महापालिका बरखास्त केली. १ नोव्हेंबर हा दिवस बेळगावात ‘काळा दिन’ म्हणून पाळला जातो. या दिवशी मराठी भाषिकांनी कर्नाटक शासनाच्या विरोधात काढलेल्या मोर्चावरून मराठीद्वेष्ट्या कानडी सरकारने हा सूड उगवला आहे. याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

 

दरम्यान, नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज बेळगाव महापालिका बरखास्तीचे पडसाद उमटताय विधानभवनाच्या पाय-यांवर शिवसेनेनं कर्नाटक सरकारचा निषेध केलाय.

 

हा तर लोकशाहीला काळीमा फासणारा निर्णय असल्याची टीका करीत कर्नाटक सरकार बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय. तर कर्नाटक सरकारच्या या मराठीद्वेषाचे पडसाद विधानसभा आणि विधानपरिषदेत उमटण्याची चिन्हं दिसताहेत. भाजप-शिवसेनेसह विरोधक हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरण्याची शक्यता आहे.

 

सोबतच कापसाचा प्रश्न, सोयाबिनचा प्रश्न त्यातूनच आमदारांवर झालेली निलंबनाची कारवाई या मुद्द्यावर सुद्धा आज पुन्हा रणकंदन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'सामना'तून कर्नाटक सरकारवर तीव्र टीका केलीय. तर महाराष्ट्र सरकारवरही कडाडून हल्ला चढवलाय.

 

कोल्हापूर बंद

कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका बरखास्त केल्याच्या निषेर्धात आज शिवसेनेने कोल्हापूर बंदची हाक दिली होती. काही किरकोळ घटना वगळता कोल्हापूर बंद आहे. मराठी भाषकांच्या ताब्यात असलेली महापालिका बरखास्तीचा आदेश कर्नाटक सरकारनं दिल्यानं मराठी भाषकांत संतापाची लाट उसळलीय.

 

[jwplayer mediaid="14785"]