येडियुरप्पांना कोर्टाचा दिलासा

अवैध खाण प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. अवैध खाण प्रकरणात दाखल करण्यात आलेला 'एफआयआर' रद्दबातल करण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Updated: Mar 7, 2012, 09:06 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

अवैध खाण प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे.  अवैध खाण प्रकरणात  दाखल करण्यात आलेला 'एफआयआर' रद्दबातल करण्याचे आदेश  कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत.

लोकायुक्त पोलिसांना येडियुरप्पा यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरविरोधात त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज  सुनावणी झाली. या सुनावणीच्या दरम्यना,  एफआयआर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या निर्णयामुळे येडियुरप्पा यांना  दिलासा मिळाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भक्तवत्सला आणि गोविंदराजू यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला.

अवैध खाण प्रकरणी  येडियुरप्पा यांच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली होती. तसेच लोकायुक्तांच्या अहवालामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचाही राजीनामा द्यावा लागला होता.  दरम्यान, पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी येडियुरप्पा यांनी फिल्डींग लावली होती. त्यांनी पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले होते. आता त्यांना दिलासा मिळाल्याने त्यांच्या राजकीय भूमिकडे लक्ष लागले  आहे.