www.24taas.com, चेन्नई
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या माजी सहकारी शशिकला यांचे बंधू दिवाकरन यांना आज शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. एका महिलेचे घर उध्वस्त केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आले आहे.
तीन दशकांहून अधिक काळ शशिकला जयललिता यांच्या जवळच्या सहायक होत्या. मात्र, शशिकला पक्षाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या संशयावरून जयललिता यांनी त्यांची डिसेंबर २०१० मध्ये पक्षातून हकालपट्टी केली होती.
दिवाकरन यांना त्रिवुवर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघममधून हकालपट्टी केल्यानंतर पहिल्यांदाच शशिकला यांच्या कुटुंबावर ही कारवाई करण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने दिवाकरन यांचा जामीन नामंजूर केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.