www.24taas.com, नोएडा
उत्तर प्रदेशात मायावती आणि हत्तींचे पुतळे झाकण्याची जोरदार कारवाई सुरू झाली आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात गेल्या दोन दिवसांपासून टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र या कारवाईला आज वेग आला. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशाला अलाहाबाद हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.
यावर उद्या सुनावणी होणार आहे. ७ जानेवारीला निवडणुक आयोगाने हे आदेश दिले होते पण गेल्या २ दिवसात याबाबत कोणतीही पावलं उचलतांना अधिकारी दिसले नाही. सध्या उत्तरप्रदेशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुतळ्यांवरुन रण पेटलेलं दिसत आहे. निवडणुक आय़ोगाने दिलेल्या आदेशानुसार लखनऊपासून नोएडापर्यंतच्या एकुण ३९६ पुतळे झाकावे लागणार आहेत.
यामध्ये हत्तीचे छोटे पुतळे १९०,मध्यम आकाराचे १६९ आणि मोठ्या मुर्ती २२ आहेत तर मायावतींचे ६ छोटे पुतळे आणि ९ मोठे पुतळे झाकावे लागणार आहेत. हे सगळे पुतळे झाकण्यासाठी १० हजार मीटरहून जास्त कापड आणि पॉलिथीन लागणार आहे.ज्यात ४ लाख मीटर कापड आणि साडेसात लाख मीटर पॉलिथीन लागणार आहे.