अण्णांचा सल्ला, तरुणांनी रस्त्यावर यावं!

जनलोकपालसाठी देशातल्या तरुणांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलयं. जळगावात अण्णांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अण्णांनी जनलोकपालविषयी आपली भूमिका मांडली.

Updated: Mar 28, 2012, 11:46 AM IST

www.24taas.com, जळगाव

 

 

जनलोकपालसाठी देशातल्या तरुणांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलयं. जळगावात अण्णांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अण्णांनी जनलोकपालविषयी आपली भूमिका मांडली.

 

 

येत्या मे महिन्यात देशातल्या प्रत्येक राज्याचा दौरा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जनलोकपालसाठी देशव्यापी जनजागृती मोहीम हाती घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आपण रामलिलावर आंदोलन करणार तर कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय.

 

 

टीम अण्णाच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात लोकसभेत खासदारांनी आक्रमक होत गोंधळ घातला. त्यानंतर या विषयावर लोकसभेत नोटीस बजावल्यानंतर चर्चा झाली. टीम अण्णाचे सदस्य खासदारांना लुटारू, भ्रष्टाचारी किंवा बलात्कारी म्हणून हिणवत असतील तर ते त्याच खासदारांकडून लोकपाल बिल पास करून घेण्यासाठी प्रयत्न का करतायत, असा सवाल उपस्थित झाला.

 

 

संसदेवर आणि खासदारांवर केलेल्या टीकेच्या विरोधात संसदेनं प्रस्ताव आणत टीम अण्णावर टीकेचा भडीमार केला. देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या संसदेवरच जर टीका होत असेल, तर देशाच्या लोकशाहीचं भवितव्यच धोक्यात येण्याची शक्यता शरद यादव यांनी व्यक्त केली. टीका करणा-या टीम अण्णांच्या सदस्यांना संसदेत आरोपीप्रमाणं उभं करावं अशी मागणी मुलायमसिंह यादव यांनी केली.