www.24taas.com, बीड
महाराष्ट्रातच सावित्रीच्या लेकी असुरक्षित आहेत. बीडमध्ये स्त्री भ्रूण हत्येचे धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. बीडमध्ये मान्यता रद्द झालेलं भगवान हॉस्पिटल सर्रास सुरू असल्याचं उघड झालंय.
बीडमध्ये आज दोन स्त्री भ्रूण हत्यांचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्ह्यातल्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्च ऑपरेशनचे आदेश देण्यात आले होते. या सर्च ऑपरेशन दरम्यान हे हॉस्पिटल सुरू असल्याचं उघड झालंय. धक्कादायक बाब म्हणजे या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान चाचण्या होत असल्यानं या हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात आली होती. पण हॉस्पिटल मागच्या दारानं सर्रास सुरू असल्याचं आजच्य सर्च ऑपरेशन दरम्यान उघड झालं.
विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच हे हॉस्पिटल आहे. तरीही हे हॉस्पिटल मागच्या दारानं सुरू असल्याचं पोलिसांच्या लक्षात कसं आलं नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे बीडमध्ये गर्भलिंग निदान चाचण्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, याचाही शोध घेणं गरजेचं झालंय.