आंगणेवाडी भक्तांवर घाला, २ ठार

संगमेश्वर येथे झालेल्या अपघातात ३ महिला ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची स्थिती गंभीर असून त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कुटुंब मुंबईतील राहणारं आहे.

Updated: Feb 25, 2012, 09:20 AM IST

www.24taas.com, रत्नागिरी

 

मुंबईहून मालवण येथे आंगणेवाडीच्या जत्रेला जाणाऱ्या भाविकांच्या बसला शुक्रवारी पहाटे मुंबई-गोवा हायवेवर संगमेश्वरजवळ शिंदे-आंबेरे गावाजवळ झालेल्या अपघातात दोन महिला मृत्युमुखी पडल्या, तर अन्य १८ जण जखमी झाले.  काही जखमींची स्थिती गंभीर असून त्यांना डेरवण आणि  रत्नागिरीत जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कुटुंब मुंबईतील राहणारं आहे.

 

मुंबईहून सिंधुदुर्गातील आंगणेवाडीला जाणाऱ्या भक्तांच्या मिनीबसला हा अपघात  सकाळी ६ वाजता झाला. ही मिनीबस आंबेरे येथील एका कॉजवेवरून कोसळली. या अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्यात. २५ फेब्रुवारीला आंगणेवाडीची जत्रा आहे. या जत्रेला मोठ्या संख्येने मुंबईकर येत असतात. त्यामुळे दोन दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर  वाहनांची संख्या वाढलेली आहे.  हा  अपघात  मुंबई-गोवा महामार्गावर  संगमेश्वर जवळ झाला. मृतांची ओळख पटली असून लक्ष्मी गणेकर, अनुराधा सावंत अशी ठार झालेल्या महिलांची नावं आहेत. हे मुंबईतल्या कोळीवाडाचे रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="54455"]

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x