झी २४ तास वेब टीम, ठाणे
टोल नाक्यांवरील टोलवसुलीविरोधात शिवसेनेनं ठाण्यात रास्ता रोको केला. वाहनचालकांनी टोल देऊ नये असं आवाहनही करण्यात आलं. ठाण्यातल्या एलबीएस मार्गावरील एमईपी कंपनीच्या टोलनाक्यावर हे आंदोलन करण्यात आलं.
यावेळी टोलवसुली बंद पाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. गेली अनेकवर्ष एमईपीच्या टोल नाक्यावर टोल वसुली सुरु आहे. ही टोलवसुली अवैध असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत पंधरा शिवसैनिकांना ताब्यात घेतल आहे. विधानसभेत विरोधकांनी टोलच्या मुद्यावर आवाज उठवल्यानंतर शिवसैनिकांनी टोलविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरु केलं.
अनेक ठिकाणी अवैधरित्या टोल वसुली केली जात असल्याने त्याविरोधात आवाज उठविण्यात आला होता असे समजते. टोल नाक्यावरील वसूलीमुळे अनेक सामान्य वाहक त्रस्त असल्याने त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
[jwplayer mediaid="15815"]