ठाण्यात अंध, अपंगांना ठेंगा

ठाण्यात यापुढे अंध आणि अपंगांना फूटपाथवर स्टॉल मिळणार नाहीत. तसा निर्णय महापालिकेच्या येत्या १९ तारखेला होणा-या बैठकीत घेतला जाणार आहे. फूटपाथवर स्टॉलची संख्या वाढू नये यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे.

Updated: May 16, 2012, 10:50 AM IST

www.24taas.com, ठाणे

ठाण्यात यापुढे अंध आणि अपंगांना फूटपाथवर स्टॉल मिळणार नाहीत. तसा निर्णय महापालिकेच्या येत्या १९ तारखेला होणा-या बैठकीत घेतला जाणार आहे. फूटपाथवर स्टॉलची संख्या वाढू नये यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे.

शहरातल्या फूटपाथवर सध्या स्टॉलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं वाहतूक कोंडी होतीय. नागरिकांनी यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्याचा अभ्यास करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं फूटपाथवर यापुढं स्टॉल्सला परवानगी देऊ नये अशी शिफारस केली आहे. तर फूटपाथवर अनधिकृत स्टॉल्स असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी मात्र स्टॉल्स न देण्याचा ठराव आणू नये अशी मागणी अपंग विकास कामगार संघटनेनं केली आहे.