पनवेल निवडणुकीत यंदा मनसेही

पनवेल नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा मनसेही उतरणार आहे. नगरपरिषदेच्या आखाड्यात मनसे पहिल्यांदाच उतरणार असल्यानं सत्ताधाऱ्यांना आणखी एक वेगळं आव्हान असणार आहे.

Updated: Nov 24, 2011, 03:55 PM IST

झी २४ तास वेब टीम, पनवेल

पनवेल नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा मनसेही उतरणार आहे. नगरपरिषदेच्या आखाड्यात मनसे पहिल्यांदाच उतरणार असल्यानं सत्ताधाऱ्यांना आणखी एक वेगळं आव्हान असणार आहे.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि मनसेनं या पालिका निवडणुकीत एक पाऊल पुढे टाकलं. मनसेनं नविन पनवेलमध्ये म्हणजे शहरी भागात आपले १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. सुशिक्षित उमेदवारांमुळे पनवेलवासीयांचा विकास आम्हीच करू, असा दावा मनसेतर्फे केला जातो आहे.

मराठीचा मुद्दा आणि आत्तापर्यंत केलेली विकासकामं हे मुद्दे घेऊन मनसे नगरपालिकेच्या रणांगणात उतरली. मागील ५ वर्षात पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात दलबदलु राजकारण खेळलं गेलं. त्यामुळं विकासकामं बाजूला पडल्याची खंत पनवेलकर व्यक्त करत आहेत. मनसेनं आता इथल्या राजकारणात सक्रीय उडी घेतल्याने समस्यांना वाचा फुटणार की समस्या तशाच राहणार हेच पहायचं.