हा तर सेनेचा रडीचा डाव – जितेंद्र आव्हाड

शिवसेनेनं रडीचा डाव खेळत ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली, असा आरोप राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी केलाय. कोकण भवनातून पाठिंब्याबाबतचं पत्र न मिळाल्यामुळं महापौरांनी निवडणूक पुढे ढकललीय.

Updated: Mar 19, 2012, 07:41 PM IST

www.24taas.com, ठाणे

शिवसेनेनं रडीचा डाव खेळत ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली, असा आरोप राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी केलाय. कोकण भवनातून पाठिंब्याबाबतचं पत्र न मिळाल्यामुळं महापौरांनी निवडणूक पुढे ढकललीय.

मनसेनं पाठिंबा दिल्यामुळेच महायुतीनं महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली होती. मात्र नाशिकमध्ये शिवसेनेनं मनसेला महापौरपदासाठी पाठिंबा दिला नाही. त्यामुळं राज ठाकरेंनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

आता स्थायी समितीसारख्या महत्वाच्या निवडणुकीत मनसे नाशिकचा बदला घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पुरेसं संख्याबळ नसल्यानं शिवसेना बिथरलीय. आणि म्हणूनच शिवसेना हा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप करण्यात येतोय.