अण्णांनी भाजपकडून सुपारी घेतल्याच्या आरोपावर ठाम असल्याचं उद्योगमंत्री नारायण राणेंनी स्पष्ट केलंय. यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हामध्ये घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार अण्णांची बाजू कशी काय घेतात असा सवाल करत त्यांच्यावर टीका केली. कापसाला सहा हजारांचा भाव देण्याची मागणी करणा-या उद्धव ठाकरेंना कपाशीच्या जातींची माहिती नसल्याचा टोलाही राणेंनी लगावला.
उद्धव ठाकरेंनी दिवाकर रावतेंच्या कापूस दिंडीचा समारोप करताना कापसाला क्विंटलला सहा हजार रुपये भाव द्या नाहीतर विदर्भ बंद करु असा इशारा दिला होता. सुधीर मुनगंटीवारांनी आयुष्यभर सुपारी घेणाऱ्यांनी अण्णांवर आरोप करु नये अशी टीका नारायण राणेंवर केली होती त्याला प्रत्युत्तर नारायण राणेंनी दिलं.