www.24taas.com , नागपूर
नागपूरच्या चिरवली ले आऊट परिसरात सात मजली इमारत कोसळलीय. त्यात दोघांचा मृत्यू झालाय तर ११ व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आलं.
कोल्ट स्टोरेजसाठी निर्माणाधीन असलेली ही इमारत कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक मेहनत करून मजूरांची सुटका केली. प्रमोद खंडेलवाल यांच्या मालकीची ही इमारत असून तिचं बांधकाम सुरू होतं.
दरम्यान, इमारतीच्या बांधकामाची आणि कोल्ड स्टोरेजची रितसर परवानगी घेतली होती, असं नागपूर सुधार प्रन्यास अधिका-यांनी स्पष्ट केलंय. मरण पावलेल्या मजुरांची नावे संतराम भारती आणि दिलीप अशी आहेत.