परिस्थिला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावच्या कलावती बांदुरकर यांच्या विवाहित मुलीनं बिकट आर्थिक स्थितीमुळं कंटाळून आत्महत्या केलीय.

Updated: Oct 20, 2011, 08:13 AM IST


झी २४ तास वेब टीम,
 यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावच्या कलावती बांदुरकर यांच्या विवाहित मुलीनं बिकट आर्थिक स्थितीमुळं कंटाळून आत्महत्या केलीय. मात्र हा अपघात असल्याचं पोलिसांचं मत आहे. तर ग्रामस्थांनी पोलिसांचा दावा फेटाळल्यानं या प्रकरणाचा गुंता वाढलाय.

 

यवतमाळ हा कर्जबाजारी शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्यांचा जिल्हा. जळका गावातील परशुराम बांदुरकर या कर्जबाजारी शेतक-यानं२००५ साली कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर राहूल गांधीनी परशुराम बांदुरकरांची पत्नी कलावतीला भेटून त्यांचं सांत्वन केल्यानं त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. मात्र आता कलावतीच्या मुलीनंही आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या केलीए. मृत्यूपूर्व जबानीत सवितानं तिचा पदर स्टोव्हला लागून पेट घेतल्याचं सांगीतलं होतं.

 

मात्र सविताच्या घरात स्टोव्ह नसून साधी चूल असल्याचं स्पष्ट झाल्यानं ही आत्महत्याच असल्याचं स्पष्ट होतंय. एकंदरीतच एका कलावतीची काळजी वाहण्यापेक्षा कर्जात बुडालेल्या अश्या लाखो कलीवतींना आता आधार देण्याची गरज या निमीत्तानं पुढे आलीए.