पाणीप्रश्नावर आंदोलन - अण्णा हजारे

राज्यातल्या पाणीप्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सराकारने योग्य कारवाई न केल्यास मोठं आंदोलन उभारलं जाईल अंसही अण्णा म्हणाले.

Updated: May 17, 2012, 10:24 AM IST

www.24taas.com, नागपूर

 

राज्यातल्या पाणीप्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सराकारने योग्य कारवाई न केल्यास मोठं आंदोलन उभारलं जाईल अंसही अण्णा म्हणाले.

 

राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अनेक जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी टॅंकर जात नसल्याने मैलोनमैल पाण्यासाठी पायपीठ करावी लागत आहे. असे असताना राज्यशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी पैसे खर्च केले. मात्र, पाणी मिळण्याऐवजी पैसेच जास्त जिरले, त्यामुळे पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे.

 

दरम्यान, सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरून  कॅबिनेट बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत जोरदार खडाजंगी झाली. श्वेतपत्रिकेबाबत राष्ट्रवादीनं अनुकुलता दर्शवलीय. त्यानंतर पुढील पंधरा दिवसात सिंचनाबाबत सादरीकरण झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढण्यात येईल अशी माहिती मुख्य़मंत्र्यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तत्पूर्वी कॅबिनेटच्या बैठकीत जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंनी सिंचनाबाबत सादरीकरण करू देण्याची मागणी केली.

 

तसंच कृषी खात्याकडून सिंचनाबाबत दिली गेलेली आकडेवारी सादरीकरणासाठी हवी असल्याचीही मागणी केली. यावर काँग्रेस मंत्र्यांनी सादरीकरण नव्हे तर श्वेतपत्रिकाच काढण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही श्वेतपत्रिकाच हवी मात्र सादरीकरण करण्याची गरज असल्याची भूमिका घेतली. तसंच श्वेतपत्रिकेबाबत बैठकीतच निर्णय घेण्याची मागणी केली. मात्र सादरीकरणानंतरच श्वेतपत्रिका काढली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये श्वेतपत्रिकेच्या मुद्द्यावरून जुंपली असताना जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी कॉंग्रेसवर पलटवार करत श्वेतपत्रिका काढल्या नंतर भ्रष्टाचार झाला की नाही हे समजेलच असा टोला लगवलाय.. एवढच नाही तर राष्ट्रावादीचा श्वेत पत्रिकेला कधी विरोध नव्हता असाही त्यांनी म्हटल आहे.