जळगावात बंदला हिंसक वळण

सरकारच्या शेतकऱ्यांविषयी असणाऱ्या दुटप्पी धोरणाला विरोध करण्यासाठी आज विदर्भासह, खान्देशात आणि मराठवाड्यात बंद पुकारण्यात आला. पण जळगावमध्ये काही ठिकाणी अनेक दुकाने सुरू असल्याचे शिवसैनिंकाना समजले असता त्यांनी जळगाव मधील फुले मार्केटमधील दुकाने बंद करण्यासाठी या दुकानांवर दगडफेक केली

Updated: Dec 15, 2011, 06:49 AM IST

झी २४ तास वेब टीम, जळगाव

 

सरकारच्या शेतकऱ्यांविषयी असणाऱ्या दुटप्पी धोरणाला विरोध करण्यासाठी आज विदर्भासह, खान्देशात आणि मराठवाड्यात बंद पुकारण्यात आला. पण जळगावमध्ये काही ठिकाणी अनेक दुकाने सुरू असल्याचे शिवसैनिंकाना समजले असता त्यांनी जळगाव मधील फुले मार्केटमधील दुकाने  बंद  करण्यासाठी या दुकानांवर दगडफेक केली, आणि त्यासोबतच पोलिसांशी बाचीबाची झाल्याने पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुकी झाली. यामुळे या बंदला हिंसक वळण लागले आहे.

 

कापूस, सोयाबिन आणि धानाला हमीभावाऐवजी मदत जाहीर केल्याच्या निषेधार्थ युतीनं खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात आज बंद पुकारला आहे. अकोल्यात युतीच्या बंदमध्ये मनसेनंही उडी घेतली  आहे. शहरातल्या शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवल्या आहेत. तसंच  बसस्टँड चौकात बसेसची हवा सोडली. तर यवतमाळमध्ये बंद यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.

 

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीमध्येही युतीच्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही बंदला प्रतिसाद मिळाला.