राष्ट्रवादीचे ईश्वरलाल जैन अडचणीत

जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ईश्वरलाल जैन यांची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश शासनानं दिलेत.त्यामुळे जैन चांगलेच अडचणीत आलेत. गेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.

Updated: Dec 14, 2011, 10:40 AM IST

झी २४ तास वेब टीम, जळगाव

 

जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ईश्वरलाल जैन यांची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश शासनानं दिलेत.त्यामुळे जैन चांगलेच अडचणीत आलेत.

 

गेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्याची दखल घेत सागवानाची तोड केल्याप्रकरणी शासनाने सीआयडी चौकशीचे आदेश दिलेत. खासदार जैन यांनी जामनेर शिवारात २० हेक्टर जमिनीत सागवान वृक्षाची लागवड केली. नियम धाब्यावर बसवत दुप्पट म्हणजे दीड लाखांवर झाडांची लागवड त्यांनी केली.

 

त्यानंतर या झाडांची विक्री करण्याची परवानगीही त्यांनी वनविभागाकडे मागितली. पण या झाडांची वाहतूक करताना वाहनांचे बनावट क्रमांक दाखवण्यात आले. तसंच वन आणि महसूल विभागाच्या मदतीने शेतीचं उत्पन्न दाखवून आयकर चुकवून शासनाची फसवणूक केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. खडसेंच्या तक्रारीची दखल घेत शासनानं जैन यांच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिलेत.

 

दरम्यान आयकर सेटलमेंट कमीशनने हे प्रकरण निकाली काढल्याचा दावा खासदार जैन यांनी केलाय.