गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड

सांगली जिल्ह्यात म्हणजे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा तालुक्यातील तीन एकर जमिनीवर अफूची लागवड केली जात असल्याचं उघड झाले आहे. तर कोल्हापुरातही अफुची लागवड करण्यात आल्याचं पुढे आले आहे.

Updated: Feb 28, 2012, 06:27 PM IST

www.24taas.com,  सांगली

 

सांगली जिल्ह्यात म्हणजे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा तालुक्यातील तीन एकर जमिनीवर अफूची लागवड केली जात असल्याचं उघड झाले आहे. तर कोल्हापुरातही अफुची लागवड करण्यात आल्याचं पुढे आले आहे.

 

 

पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकलेत. अतिरीक्त अधीक्षक दिगंबर प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु आहे. गुन्हेगारांना झोडण्याची फोडण्याची भाषा करणा-या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अफूचे म्हणजेच विषाचे सौदागर खुलेआम व्यवहार करतायेत. अफूच्या शेतीच्या निमित्तानं एक प्रकारे अंमली पदार्थाच्या व्यापा-यांनी पोलिसांना आणि आर आर पाटील यांनाच आव्हान दिलय. ' झी २४तास'नं बीडमधील अफूच्या शेतीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर आता सांगलीत अफूच्या लागवडीचं प्रकरण उघडकीस आला.

 

 

दरम्यान,  बीड जिल्ह्यातल्या शिरसाळा भागात ३००एकरवर अफूची लागवड केल्याचं प्रकरण उघडकीस आलं असतानाच शेजारच्या पोहणेर गावातही चार एकरांवर अफूची लागवड केल्याचं उघड झालयं. पोलिसांना या शेतीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोहणेरमध्ये छापा टाकला. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीड जिल्ह्यात आणखी कोणत्या ठिकाणी अफूची लागवड केली जातेय याचा पोलीस शोध घेतायेत. या प्रकरणाच्या सूत्रधारांपर्यंत पोलीस अद्यापही पोहचू शकलेले नाहीत. मात्र लागवड करणा-या ५३  लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

या संबंधित आणखी बातमी

अफूच्या शेतीच्या चौकशीचे आदेश

 

 

पाहा व्हिडिओ..

 

[jwplayer mediaid="56694"]

[jwplayer mediaid="56974"]