पुणे स्फोट: CCTV फुटेजमधून धागेदोरे हाती

पुणे साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात एटीएसच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागलेत. सीसीटीव्ही फूटेजच्या तपासातून दोन संशयित आरोपींच्या सहभागाची माहिती पुढे आलीय.

Updated: Aug 8, 2012, 03:34 AM IST

www.24taas.com, पुणे

पुणे साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात एटीएसच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागलेत. सीसीटीव्ही फूटेजच्या तपासातून दोन संशयित आरोपींच्या सहभागाची माहिती पुढे आलीय.

पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट आणि आणि देशातील इतर भागातल्या बॉम्बस्फोटांमध्येही या दोन संशयित आरोपींचा सहभाग आहे. पोलीस या आरोपींच्या शोधात आहेत. याच आरोपींनी पुण्यात कमी तीव्रतेचे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले, असा पोलिसांचा अंदाज आहे. 1 ऑगस्ट ला पुण्यात चार ठिकाणी कमी तीव्रतेचे स्फोट झाले होते. या स्फोटानंतर आणखी दोन ठिकाणी स्फोटकं निकामी करण्यात आली होती.

.