पुणेकरांसाठी आता PMARD लवकरच....

पुणे आणि परिसराच्या विकासासाठी आता नवं प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईच्या एमएमआरडीएच्या धर्तीवर पुण्यासाठी पीएमआरडीए स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधान परिषदेत केली.

Updated: Apr 10, 2012, 08:56 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुणे आणि परिसराच्या विकासासाठी आता नवं प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईच्या एमएमआरडीएच्या धर्तीवर पुण्यासाठी पीएमआरडीए स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधान परिषदेत केली. तीन महिन्यांत याबाबतचा अभ्यास झाला की प्राधिकरण स्थापन केलं जाईल.

 

अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पुणे, पिंपरी चिंचवड, लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहू रोड आदी भागांचा या प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात येणार आहे. PMRDA ची स्थापना तीन महिन्यांत होणार असली तरी पहिल्यांदा १९९७ मध्ये म्हणजेच १५ वर्षांपूर्वी याची घोषणा झाली होती.

 

तीन महिन्यांत अस्तित्वात येणारे पीएमआरडीए कसे असणार आहे !

 

-  MMRDA च्या धर्तीवर येत्या ३ महिन्यांत पुणे आणि परिसरासाठी PMRDA ची स्थापना

 

-  पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव- दाभाडे, लोणावळा, देहू रोड या  भागांचा समावेश

 

-  मावळ, हवेली आणि शिरुरमधील काही भागांचा समावेश

 

-  एकूण क्षेत्र - २३०० चौरस किलोमीटर

 

-  लोकसंख्या अंदाजे ५३ लाख