www.24taas.com, पुणे
पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीतल्या संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाल्याचं समजतेय. तसंच उद्यापासून सुरू होणा-या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडं असलेल्या खात्यांबाबत रणनिती ठरवण्यात आल्याचही बोलले जात आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेधनात सिंचनाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी झाली होती. त्यामुळं आता तयारी करून विरोधकांना तोंड देण्यासाठी राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी केल्याचं बोललं जातंय. मात्र बैठकीबाबत बोलण्यात शरद पवारांसह सर्वांनीच मौन बाळगलं. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, भुजबळ, आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांनीही उपस्थिती लावली होती.
दरम्यान, मंत्रालयाला लागलेली आग आटोक्यात आणण्यास आलेलं अपयश, आदर्श घोटाळा प्रकरणामुळे सरकारची झालेली बदनामी, पाटबंधारे प्रकल्पांचा अनपेक्षित वाढलेला खर्च, जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंवर झालेले जमीन घोटाळ्याचे आरोप, सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा, राज्यातील दुष्काळाची स्थिती आणि लांबलेला पाऊस, शेतकऱ्यांना सहकारी बँकांकडून पिक कर्ज मिळण्यात येत असलेल्या अडचणी, कोकणातील अनधिकृत खनिज उत्खनन आदी मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला कात्रित पकडण्याची नामी संधी राष्ट्रवादीही सोडणार नाही. परंतु आपल्याही पक्षाचे काही मंत्री घोट्याळ्याप्रकरणी चर्चेत असल्याने काय करायचे यावरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
व्हिडिओ पाहा
[jwplayer mediaid="135597"]