www.24taas.com, पुणे
व्यंगचित्र एनसीईआरटी (NCERT) च्या पुस्तकातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यंगचित्रावरून राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या पुणे विद्यापीठातल्या ऑफिसवर हल्ला करण्यात आला आहे. रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलय. पळशीकर व्यंगचित्र एनसीईआरटी (NCERT) चे माजी सल्लागार आहेत. कालच त्यांनी सल्लागारपदाचा राजीनामा दिला होता. या कार्टुनवरून काल संसदेतही गदारोळ झाला होता. त्यानंतर सरकारला वादग्रस्त पुस्तकाचं वितरण रोखण्याची घोषणा करावी लागली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यंगचित्राचा वाद आता चिघळला आहे. बाबासाहेबांच्या व्यंगचित्रामुळे व्यथित झालेल्या भीमसैनिकांनी आज सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावर हल्ला चढवला. पळशीकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पळशीकर यांचे कार्यालय गाठले. पळशीकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर संतप्त तीन कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली आहे. दरम्यान, रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा स्पष्ट झालं आहे. या संघटनेचे अध्यक्ष सचिन खरात यांनी ही जबाबदारी स्विकारली आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांचं वादग्रस्त व्यंगचित्र एनसीईआरटी (NCERT) च्या पुस्तकातून काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर यांनी काल एनसीईआरटीच्या राज्यशास्त्र विभागाच्या मुख्य सल्लागारपदाचे राजीनामे दिले आहे. सरकारचा निर्णय आपल्या मान्य नसल्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं पळशीकर यांनी स्पष्ट केले होते. याच मुद्यावर आक्षेप घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तीन कार्यकर्त्यांनी पळशीकर यांच्याशी आज चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते.
व्हिडिओ पाहा...
[jwplayer mediaid="99622"]