स्मिता पाटीलची राष्ट्रवादीत एंट्री

राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांची मुलगी स्मिता पाटील हिने राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या माध्यमातून स्मितानं राजकारणात पाऊल टाकलं आहे.

Updated: Jul 2, 2012, 08:45 PM IST

www.24taas.com, सांगली

 

राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांची मुलगी स्मिता पाटील हिने राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या माध्यमातून स्मितानं राजकारणात पाऊल टाकलं आहे.

 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उद्या मंगळवारी होणार्‍या सांगली दौर्‍यातील युवती मेळाव्यात स्मिता पाटील राजकारणात प्रवेश करणार आहे.  सांगली शहरातील अनेक भागात या कार्यक्रमाचे पोस्टर्स लागले आहे. या पोस्टर्सवरील प्रमुख चेहरा हा स्मिताचा आहे. स्मितानं राजकारणात येताना मंत्र्याची मुलगी म्हणून नाही तर खर्‍या अर्थानं समाजकार्य करुन स्वत:ची ओळख तयार करावी, असा सल्ला तिचे वडील आणि  गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे. माझी मुलगी हे तिचं डिमेरीट ठरु नये , अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

स्मिता पाटील हिने सांगितले की, युवतींचा मोठा सहभाग मिळत आहे. आम्ही दौरा केला आहे. या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ताईंनी (सुप्रिया सुळे) युवतींशी संवाद साधला. युवतींच्या अनेक अडचणी आहेत.  त्या अडचणी सोडविण्यासाठी ताईंनी प्रयत्न सुरू केले आहेत.  ग्रामीण भागातील युवतींची समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.  सामान्य कुटुंबातील मुली राजकारणात याव्यात, हा प्रमुख उद्देश आहे. शरद पवार साहेबांनी महिलांसाठी ३० वरून ५० टक्के आरक्षण केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुली राजकारणात येण्यासाठी हा प्रयत्न आहे. ताईंनी त्यासाठी सांगलीत मेळावा आयोजित केला आहे.

 

व्हिडिओ पाहा

[jwplayer mediaid="131468"]