आला थंडीचा महिना....

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशभरात कडाक्याची थंडी पसरली आहे. उत्तर भारतात थंडीचा विशेष प्रभाव जाणवतो आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर भागातही थंडीचा प्रभाव जाणवतांना दिसतो आहे

Updated: Dec 19, 2011, 04:38 AM IST

झी २४ तास वेब टीम

 

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशभरात कडाक्याची थंडी पसरली आहे. उत्तर भारतात थंडीचा विशेष प्रभाव जाणवतो आहे. कडाक्याच्या थंडीमुळे देशभरात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. लेह, झारखंड, बिहार, दिल्ली भागात कमालीची थंडी जाणवते आहे. गयामध्ये तापमान ३ अंशाखाली गेल आहे.

 

राज्यात नाशिक, जळगाव, बुलढाणा, नागपूर, अकोला, अमरावती भागातल्या तापमानात गेल्या आठवड्यापासून सातत्यानं घट होते आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर भागातही थंडीचा प्रभाव जाणवतांना दिसतो आहे. तापमानात घट झाल्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी गुलाबी थंडी जाणवू लागली आहे.

 

यंदा नोव्हेंबर महिन्यात ढगाळ हवामान असल्यानं थंडी फारशी जाणवली नाही. मात्र डिंसेबर सुरू होताच आता थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे  नागरिकांना स्वेटर, मफलर, शाल अंगावर घेऊनच फिरावं लागतं. थंडीमुळे उबदार कपड्यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. कोकणातही थंड वारे वाहू लागल्यानं आंबा आणि काजू बागायतदार सुखावले आहेत.