पुन्हा एकदा राज्यपाल के. शंकरनारायणनच

के. शंकरनारायणन यांची राज्यपालपदी दुसरी टर्म देण्यात आली आहे. त्यामुळे के.शंकरनारायणन राज्यपाल म्हणून कायम राहणार आहेत. केंद्राकडून त्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे.

Updated: Apr 29, 2012, 08:12 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

के. शंकरनारायणन यांची राज्यपालपदी दुसरी टर्म देण्यात आली आहे. त्यामुळे के.शंकरनारायणन राज्यपाल म्हणून कायम राहणार आहेत. केंद्राकडून त्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे.

राज्यपालांनी महाराष्ट्रातल्या आपल्या कारकिर्दीत उच्च शिक्षण, पर्यावरण अशा विषयांसह कल्याणकारी योजनांसंबधी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रात नियुक्ती होण्यापूर्वी के. शंकरनारायणन झारखंड, नागालॅण्ड या राज्यांच्या राज्यपालपदावर होते.

के. शंकरनारायण यांच्या आधी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून एस. एम. कृष्णा यांनी महाराष्ट्राचा कारभार पाहिला होता. मात्र त्यांच्यानंतर के. शंकरनारायण यांना राज्यपाल पद बहाल करण्यात आलं.