राज्याकडून जनतेला दिलासा नाहीच...

केंद्रातल्या काँग्रेस श्रेष्ठींनी पेट्रोलवरील काँग्रेसशासित राज्यांना पेट्रोलवरचा कर कमी करून जनतेला दिलासा देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीमुळे पेट्रोलवरच्या व्हॅटमध्ये कपात करता येणार नाही, असं स्पष्ट केलंय.

Updated: May 25, 2012, 05:05 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

केंद्रातल्या काँग्रेस श्रेष्ठींनी पेट्रोलवरील काँग्रेसशासित राज्यांना पेट्रोलवरचा कर कमी करून जनतेला दिलासा देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीमुळे पेट्रोलवरच्या व्हॅटमध्ये कपात करता येणार नाही, असं स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्यसरकारकडूनही जनतेला दिलासा मिळालेला नाही.

 

पेट्रोलच्या किंमतीत तब्बल साडे सात रुपये प्रतिलिटर अशी वाढ झाल्यानंतर उत्तराखंड, केरळ यांनी राज्यात पेट्रोलच्या करात कपात केली. त्यानंतर दिल्लीतही मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पेट्रोलच्या करात कपात करण्याचे संकेत दिले. पण, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र जनतेचा हिरमोड केलाय. आशेनं पाहणाऱ्या जनतेला त्यांनी व्हॅटमध्ये कपात येणार नसल्याचं उत्तर दिलंय.

 

मुंबईत पेट्रोलवर 26 टक्के व्हॅट आणि 1 रुपया सरचार्ज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात 25 टक्के व्हॅट आणि 1 रुपया सरचार्ज आहे.

Tags: