आकाशातून आपल्या घरात डोकावतायत कॅमेरे

अमेरिकन कंपन्यांनी सध्या प्रचंड शक्तिशाली कॅमेरे आकाशात सोडले आहेत. हे कॅमेरे हवाई नकाशांसाठी आपल्या घरामध्येही डोकावू शकतात. इतकंच नव्हे, तर घरातील ४ इंची वस्तूसुद्धा या कॅमेरांमध्ये ‘क्लिक’ होतात.

Updated: Jun 12, 2012, 08:40 AM IST

www.24taas.com, लंडन

 

अत्याधुनिक तंत्रज्ञान आपलं आयुष्य अधिकाधिक सुरक्षित करतंय, तर पुन्हा एकदा विचार करायची वेळ आली आहे. कारण अमेरिकन कंपन्यांनी सध्या प्रचंड शक्तिशाली कॅमेरे आकाशात सोडले आहेत. हे कॅमेरे हवाई नकाशांसाठी आपल्या घरामध्येही डोकावू शकतात. इतकंच नव्हे, तर घरातील ४ इंची वस्तूसुद्धा या कॅमेरांमध्ये ‘क्लिक’ होतात.

 

डेली मेल या वृत्तपत्रात यासंदर्भात बातमी देण्यात आली आहे. गूगल आणि अँपलसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्या अशा प्रकारचे कॅमेरे असणाऱी विमानं हवेत सोडणार आहेत. हे कॅमेरे घरांच्या खिडकीमधून घरातील प्रत्येक गोष्टीचा आणि कृतीचा वेध घेतील. यामुळे लोकांच्या खासगी आयुष्यावरच गदा येणार आहे.

 

अफगाणिस्तानात दहशतवादी केंद्रं ओळखण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं, तेच तंत्रज्ञान या कॅमेरांद्वारे जगभरातील लहान-सहान गोष्टी समजण्यासाठी वापरण्यात येत आहे. गुगलने या प्रकारचे कॅमेरे वापरत असल्याची कबुली दिलेली आहे. लंडनबरोबरच इतर २० ठिकाणी या कॅमेरांचं परीक्षण केलं गेलं आहे. या कॅमेरांमध्ये अक्षरशः घरात कपडे बदलत असलेल्या लोकांचे फोटोही त्यांच्या बारीक सारीक तपशिलांसकट क्लिक होतात. त्यामुळे या कॅमेरांवर बंदी घालण्याची मागणी वाढत आहे.