www.24taas.com, सॅन फ्रान्सिसको
ऍपलने तब्बल तीन दशलक्ष आयपॅड टॅबलेटस लँचच्या वीकएंडला विकले आहेत. नवीन मॉडेल लॅच केल्यानंतर पहिल्या वीकएंडला इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्रीचा हा उच्चांक असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. आयपॅडचं नवं आणि अत्याधुनिक मॉडेल ऍपलने १६ मार्च रोजी बाजारात लँच केलं. आयपॅड हा जगभरात सर्वाधिक खपणारा टॅबलेट कम्प्युटर आहे. एटीअँडटीने देखील एक दिवसात विक्रीचा विक्रम केल्याचं म्हटलं आहे.
आयपॅड पहिल्यांदा २०१० साली ऍपलने बाजारपेठेत लँच केलं. आयफोनच्या पाठोपाठ आयपॅडच्या ऍपलला सर्वाधिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. ऍपलचे मुख्य कार्यकारी
अधिकारी टीम कूक यांच्या मते आयपॅड टॅबलेट कम्प्युटर्स लवकरच पर्सनल कम्प्युटर्सची जागा घेतील. ऍपलने डिसेंबर अखेरीस संपलेल्या पहिल्या तिमाहीत १५.४ दशलक्ष आयपॅडस विकण्याचा विक्रम केला आहे.
आयपॅडचे नवे मॉडेल सध्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, प्युर्टो रिको, सिंगापूर, स्विर्त्झलँड, युनायटेड किंगडम आणि हाँगकाँगच्या बाजारपेठेत उपलब्ध आहे. आयपॅडचे नवं मॉडेल मार्च २३ रोजी आणखीन २४ देशांच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होईल.