चीनी हॅकर्सनी केली मायक्रोसॉफ्टची साईट हॅक

इविल शाडो टीम नावाच्या चीनी हॅकर्सच्या चमुने रविवारी रात्री www.microsoftstore.co.in या मायक्रोसॉफ्टच्या साईटवर हल्ला चढवला. चीनी हॅकर्सनी मायक्रोसॉफ्टची उत्पादन विकत साईटवरुन विकत घेणाऱ्या लोकांचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड चोरले.

Updated: Feb 13, 2012, 03:28 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

इविल शाडो टीम नावाच्या चीनी हॅकर्सच्या चमुने रविवारी रात्री www.microsoftstore.co.in या मायक्रोसॉफ्टच्या साईटवर हल्ला चढवला. चीनी हॅकर्सनी मायक्रोसॉफ्टची उत्पादन विकत साईटवरुन विकत घेणाऱ्या लोकांचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड चोरले.

जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीच्या वेबसाईटच्या सुरक्षिततात चीनी हॅकर्सनी भेदली ही बाब चिंताजनक आहे. त्याशिवाय कंपनीने युजर्सची माहितीचा तपशील, आयडी आणि पासर्वड हे प्लेन टेक्स्ट फाईलमध्ये स्टोअर करण्यात आले होते ही अधिक काळजीची बाब आहे. वास्तविक इतकी महत्वपूर्ण आणि गोपनीय माहिती सुरक्षितरित्या स्टोअर करण्यासाठी एनक्रिपशन आवश्यक होतं ती काळजी घेण्यात आली नाही. वेबसाईट हॅक केल्यानंतर इविल शाडो टीमने साईटवर मेसेजही पोस्ट केला.

यासंबंधीचे वृत्त  www.wpsauce.com. यांनी पहिल्यांदा दिलं. मायक्रोसॉफ्टने त्यानंतर वेबसाईट ऑफलाईन केली. मायक्रोसॉफ्ट इंडिया स्टोअर परत ऑनलाईन झाल्यानंतर युझर्सना पासवर्ड ताबडतोब बदलावा असा सल्ला आहे. त्याशिवाय त्यांनी तोच पासवर्ड किंवा लॉग इन इतर वेबसाईटवर वापरला असल्यास तोही तात्काळ बदलून टाकावा. मागच्या वर्षी लुलझेडसेक यांनी अनेक हाय प्रोफाईल वेबसाईट हॅक केल्या होत्या. सोनी सारख्या बलाढ्य कंपनीलाही हॅकिंगचा फटका बसला होता. मायक्रोसॉफ्टने अजुन या प्रकरणातून योग्य तो धडा घेतलेला दिसत नाही.