फेसबुकची चटक लागली खरी, त्यांची मुजोरी भारी

फेसबुक वाढती प्रसिद्धी आणि युझर्सना त्याची लागलेली चटक.. हे पाहता फेसबुकने आता आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे फेसबुकच्या युझर्सची नाराजी ओढावण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 3, 2012, 04:56 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

फेसबुक वाढती प्रसिद्धी आणि युझर्सना त्याची लागलेली चटक.. हे पाहता फेसबुकने आता आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे फेसबुकच्या युझर्सची नाराजी ओढावण्याची शक्यता आहे. आपल्या युझर्सना कोणतीही कल्पना न देता युझर्सच्या संपर्कमधील (Contact Info)ई-मेल आयडीमध्ये बदल केला आहे. फेसबुकच्या या निर्णयामुळे जगभरातील युझर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

फेसबुकचा वापर करणा-या युझर्सचे ई-मेल आयडी (जी-मेल, याहू मेल, हॉट मेल आदी) अन्य कंपन्यांचे असतात. त्यामुळे युझर्सच्या माहीती विभागामध्ये देखील तोच ई-मेल आयडी असतो. फेसबुकने मात्र अचानक युझर्सच्या माहीती विभागातील ई-मेल आयडीमध्ये संबंधीत युझरचा फेसबुक आयडी दाखवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे फेसबुकने यासंदर्भात युझर्सना कोणतीही कल्पाना दिली नाही.

 

फेसबुकवरील माहिती अधिक सोपी करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास फेसबुकच्या वेबसाईटवर येणा-यांची संख्या वाढू शकते असे फेसबुकचे म्हणणे आहे. फेसबुकने पूर्व कल्पना न देता केलेल्या या बदलामुळे युझरला संपर्क करण्यामध्ये अडथळे येऊ शकतात असा आरोप जगभरातील सोशल नेटवर्किंगमधील अभ्यासकांनी केला आहे. एखाद्या युझरला मेलद्वारे संपर्क करायचा असेल तर फेसबुकच्या निर्णयाचा फटका संबंधीत युझर आणि त्याला संपर्क करणा-या अशा दोघांना होण्याची शक्यता आहे.