मोबाईल ब्लॉकची होणार 'ट्राय'

मोबाईल चोरीला गेला किंवा तो हरविल्यास आता तो 'ब्लॉक' होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) प्रयत्न सुरू केले आहेत.

Updated: Nov 21, 2011, 06:54 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

मोबाईल चोरीला गेला किंवा तो हरविल्यास आता तो 'ब्लॉक' होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) प्रयत्न सुरू केले आहेत.

 

ट्राय या वर्षाअखेरीत एक मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. परिणामी मोबाईलमधील वैयक्तिक माहितीच्या दुरूपयोग टाळता येणे शक्य होणार आहे. मोबाईल 'ब्लॉक' करण्यासंदर्भातील निर्देशांमुळे दुसरीकडे अवैध मोबाईल मार्केटवरही लगाम बसेल.

 

मार्केटमध्ये एकाच इंटरनॅशनल मोबाईल इक्वीपमेंट आयडेंटीटी नंबर (आयएमईआय)चे अनेक मोबाईल आहेत. मोबाईल हरविल्यास त्याचा माग या क्रमांकावरून काढण्यात येतो परंतु एकाच आयएमईआय क्रमांकाचे मोबाईल असल्याने या कामात अडथळे येत असतात.  आता हा अडथळा दूर होणार आहे.

 

मोबाईल हरविल्यास केवळ त्याचे कार्ड ब्लॉक करता येते. भविष्यात संपूर्ण मोबाईलच ब्लॉक करण्याची सोय करण्याबाबत विचार सुरू आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.