वाट्टेल तेवढे एसएमएस... चकटफु!

योगेश पटेल यांच्यासोबत विकसित केलेल्या जेक्स्टर एसएमएस या नव्या अ‍ॅप्लीकेशनद्वारे कुठूनही, कुठेही आणि कितीही एसएमएस आता फुकटमध्ये पाठवायची सोय साबीर भाटीया यांनी केली आहे.

Updated: Nov 23, 2011, 04:50 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

भारतातल्या इंटरनेट क्रांतीत मोलाचा वाटा असणारे हॉटमेल डॉट कॉमचे जनक साबीर भाटीया आता मोबाईल क्षेत्रात क्रांती घडवण्यास सिद्ध झालेत. योगेश पटेल यांच्यासोबत विकसित केलेल्या जेक्स्टर एसएमएस या नव्या अ‍ॅप्लीकेशनद्वारे कुठूनही, कुठेही आणि कितीही एसएमएस आता फुकटमध्ये पाठवायची सोय भाटीया यांनी केली आहे.  हे जेक्स्टर एसएमएस अ‍ॅप्लीकेशन इंटरनेटची सुविधा असणाऱ्या कुठल्याही मोबाईलवर चालतं. मुख्य म्हणजे हे अ‍ॅप्लीकेशन विनाशुल्क डाऊनलोड करता येतं. सुरुवातीच्या काळात जरी फक्त इंग्लिशमधून एसएमएस पाठवायची सोय या अ‍ॅप्लीकेशनमध्ये असली, तरी लवकरच प्रादेशिक भाषांमधूनही एसएमएस पाठवायची सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती भाटीया यांनी पत्रकार परिषदेत दिली.