‘क्युरिओसिटी’तून पहिला रंगीत फोटो

नासानं मंगळावर पाठवलेल्या क्युरिओसिटीनं पाठवलेला पहिला रंगीत फोटो आणि एक व्हिडिओ नासाच्या शास्त्रज्ञांना मिळालाय. यामुळे शास्त्रज्ञांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

Updated: Aug 9, 2012, 05:42 AM IST

www.24taas.com, पासाडेना 

 

नासानं मंगळावर पाठवलेल्या क्युरिओसिटीनं पाठवलेला पहिला रंगीत फोटो आणि एक व्हिडिओ नासाच्या शास्त्रज्ञांना मिळालाय. यामुळे शास्त्रज्ञांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

 

क्युरिओसिटीनं पाठवलेला पहिला रंगीत फोटो आणि कमी रिजोल्युशनचा व्हिडिओ पाहून नासाच्या ‘जेट प्रोपल्सन लॅबोरेटरी’मध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक वैज्ञानिक आणि इंजिनिअरच्या तोंडून फक्त ‘वाह’ आणि ‘ओह’ हेच शब्द बाहेर पडत होते. क्युरिओसिटीनं पाठवलेल्या या व्हिडिओमध्ये मंगळावर उतरण्याच्या शेवटच्या क्षणाचं अडीच मिनिटांचं चित्रण आहे.

 

‘क्युरिओसिटी’ उपकरणातचे मुख्य वैज्ञानिक मायकल मॅलिन यांना तर पूर्ण व्हिडिओ पाहण्याची घाई झालीय. हा व्हिडिओ नक्कीच उत्कृष्ट असेल याबद्द्ल त्यांना खात्री आहे. मिळालेल्या फोटोमध्ये उपकरण उतरण्याच्या ठिकाणचं दृश्यं दिसतंय. यामध्ये छोटे छोटे दगडं असलेला भूभाग दिसून येतोय. एखाद्या कारच्या आकाराच्या असलेल्या ‘क्युरिओसिटी’च्या बाजुंवर लावल्या गेलेल्या कॅमेऱ्यातून हा फोटो काढण्यात आलाय.

 

.