टीम इंडियाचं 'मिशन ऑलिंपिक'

दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंज हॉकी टुर्नामेंटमध्ये भारतीय टीमला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं होतं. या पराभवामुळे भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय करु शकलेली नाही. आता टीम इंडियाचे 'मिशन ऑलिंपिक क्वालिफायर' सुरु झाले आहे.

Updated: Dec 7, 2011, 03:01 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंज हॉकी टुर्नामेंटमध्ये भारतीय टीमला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं होतं. बेल्जियमनं फायनलमध्ये भारताचा ४-३ नं पराभूत केलं होतं.

 

चॅम्पियन्स चॅलेंजची उपविजेती टीम मुंबईत परतली. या टीमचं एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मात्र फायनलमध्ये पराभूत झाल्यानं भारतानं चोकर्स ही आपली बिरुदावली कायम राखली असच म्हणावं लागणार आहे.

 

या पराभवामुळे भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय करु शकलेली नाही. आता टीम इंडियाचे मिशन ऑलिंपिक क्वालिफायर सुरु झाले आहे.