थरार बाईक रेसिंगचा!

औरंगाबादेत सध्या ‘गोल्फ डर्ट ट्रैक नैशनल बाईक चैम्पियनशीप’चा थरार सुरु आहे. या स्पर्धेत देशभरातून जवळपास १७० बाईकर्सनी सहभाग नोंदवलाय. याच पद्धतीने देशभरात ५ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत आणि यातून सर्वात जास्त गुण पटकावणारा खेळाडू बाईक रायडिंगचा नॅशनल चॅम्पियन ठरणार आहे.

Updated: Jun 5, 2012, 08:59 PM IST

 www.24taas.com, औरंगाबाद 

औरंगाबादेत सध्या ‘गोल्फ डर्ट ट्रैक नैशनल बाईक चैम्पियनशीप’चा थरार सुरु आहे. या स्पर्धेत देशभरातून जवळपास १७० बाईकर्सनी सहभाग नोंदवलाय. याच पद्धतीने देशभरात ५ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत आणि यातून सर्वात जास्त गुण पटकावणारा खेळाडू बाईक रायडिंगचा नॅशनल चॅम्पियन ठरणार आहे.

चिखलातून आणि उंच-सखल भागातून वेगानं बाईक पळवणाऱ्या बाईकस्वारांची अफलातून कसरती पाहण्याची आयती संधी औरंगाबादकरांना चालून आली आहे. या स्पर्धेत जिंकणाऱ्या खेळाडूंना २० गुण मिळतात, याप्रकारे पाच शर्यतीत जिंकणारा बाईकस्वार हा भारताचा बाईक रायडींग चॅम्पियन ठरतो. या स्पर्धेतील प्रत्येक बाईकचा स्पीड ताशी १०० किलोमीटरच्या आसपास असतो. त्यामुळे गाडी चालवणारा आणि पहाणारा दोघांनाही एका थरारक अनुभव येतो. या रेसमधील वळणं सर्वात धोकादायक असतात. ती वळण चिखलातून पार करत रेसमध्ये जिंकण इतकच या रायडर्सचं स्वप्न असतं. मात्र, योग्य ट्रेनिंग न घेता इतरांनी आपल्या या स्टंट्सची कॉपी करु नये, असा सल्लाही या रायडर्सनी नागरिकांना दिलाय.

असाच  प्रतिसाद मिळत राहिला तर भविष्यातही मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित करण्यात येईल, असं आयोजकांनी सांगितलंय. तर औरंगाबादकरांसाठीही या स्पर्धा म्हणजे एक वेगळंच थ्रील आहे.

.