हॉकी : नेदरलँडकडून भारताचा पराभव

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी दिसून आली. गगन नारंग व्यतिरिक्त कोणीही प्रभाव पाडू शकले नाही. हॉकी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. ‘ब’ गटातील सलामीच्या लढतीत हॉलंडकडून २-३ असा पराभव स्वीकारावा लागला.

Updated: Jul 30, 2012, 11:56 PM IST

www.24taas.com, लंडन

 

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी दिसून आली. गगन नारंग व्यतिरिक्त कोणीही प्रभाव पाडू शकले नाही. हॉकी संघाची  सुरुवात निराशाजनक झाली.   ‘ब’ गटातील सलामीच्या लढतीतनेदरलँडकडून  २-३ असा पराभव स्वीकारावा लागला.

 

नेदरलँडने सुरुवातीपासूनच आक्रमक हॉकी खेळली. नेदरलँडने पहिल्याच सत्रात दोन गोल केले. हॉर्स्ट वॅँडरने २० व्या मिनिटाला आणि रॉडरिक व्यूस्थॉफने २९ व्या मिनिटाला गोल झळकवले. व्यूस्थॉफने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. भारताने दुस-या सत्रात तीन मिनिटांच्या कालावधीत दोन गोल केले.

 

धरमवीर सिंगने ४४ व्या आणि संदीप सिंगने ४८ व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली होती. मात्र वीर्डेन मिन्कने दोन मिनिटानंतर लगेचच पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठवत नेदरलँडसाठी तिसरा गोल केला. भारताची स्पर्धेतील दुसरी लढत आता बुधवारी न्यूझीलंडशी होत आहे.