www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रक बोर्ड बीसीसीआयने १९९७-९८ ते २००६-०७ मध्ये एका संस्थेच्या मदतीने १० वर्षाच्या दरम्यान १९ अब्ज रूपये आयकरातून सूट मिळविली आहे. क्रीडामंत्री अजय माकन यांनी लोकसभेत प्रश्नउत्तराच्या काळात ही माहिती दिली. माकन म्हणाले की, बीसीसीआयला एका संस्थेच्या रूपाने त्यांना या आयकरामध्ये सूट देण्यात आली आहे.
सरकारी आकड्यांनुसार १९९७-९८ मध्ये बीसीसीआयने ११ कोटी १ लाख रूपये सूट मिळविली होती. १९९८-९९ मध्ये सगळ्यात जास्त १८ अब्ज १८ कोटी रूपये सूट मिळविली होती. २००५-०६ मध्ये ३२ कोटी ९९ लाख तर २००६-०७ मध्ये १ अब्ज २७ कोटी इतकी आयकरातून सूट मिळविली होती.
माकन म्हणाले आहेत की, मागील तीन वर्षात बीसीसीआयने सीमा शुल्क, केंद्रीय शुल्क आणि उत्पादन शुल्क आणि सर्विस टॅक्स यात कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकार मात्र पुन्हा एकदा क्रिकेट बोर्डावर मेहेरनजर झाले आहेत हे स्पष्ट होते.