आयसीसी बीसीसीआयमध्ये पुन्हा जुंपली

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल अर्थातच आयसीसीनं टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमध्ये अंपायर डिसीजन रिव्ह्यू सिस्टम म्हणजे डीआरएस सक्तीचं केलं आहे. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्डनं ही सक्ती झुगारलीय.

Updated: Jun 26, 2012, 09:01 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल अर्थातच आयसीसीनं टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमध्ये अंपायर डिसीजन रिव्ह्यू सिस्टम म्हणजे डीआरएस सक्तीचं केलं आहे. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्डनं ही सक्ती झुगारलीय.

आसीसीच्या बैठकीत डीआरएसवर चर्चा झाली. यावेळी भारतानं आपली नाराजी व्यक्त केल्याचं बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी म्हटलंय. बीसीसीआयच्या मते डीआरएस १०० टक्के फुलप्रुफ नाही. कुठल्याही सीरिजमध्ये डीआरएस वापरण्याचा निर्णय हा सीरिजमध्ये सभागी होणाऱ्या देशावर सोडावा, अशी भूमिका बीसीसीआयनं घेतलाय. गेले दोन दिवस सुरु असलेल्या आयसीसीच्या बैठकीत डीआरएस अनिवार्य करण्याची शिफारस करण्यात आली आहे. भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे बीसीसीआय विरुद्ध आयसीसी यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आलाय.

.