मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
www.24taas.com ,पर्थ
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे पानिपत केलं. टीम इंडियाचा पहिला डाव १६१ रन्सवर ऑलआऊट झाला.
१२ रन्स करून कर्णधार महेंद्रसिंग धोनी आऊट झाला. आर. विनय कुमार (५), झहीर खान (२), ईशांत शर्मा (३) हे झटपट बाद झालेत. तर उमेश यादव ४ रन्सवर नाबाद राहिला.
इंडिया-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे भक्कम फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर पहिल्या दिवशी मोठी धावसंख्या उभारण्याच्या टीम इंडियाच्या प्रयत्नांना लगाम बसला. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या टीम इंडियाचा ६ विकेटसह १४४ रन्सवर डोलारा कोसळला. शतक करताना टीम इंडियाला धापा टाकाव्या लागल्या.
टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग शून्यावर बाद झाल्यावर क्रिकेट रसिकांना तर धक्काच बसला आहे. त्यानंतर सचिन १५ रन्सवर आऊट झाला. सचिन पॅव्हेलियनमध्ये पोहचेपर्यंत टीम इंडियाला चौथा धक्का बसला. गौतम गंभीर ३१ रन्सवर आऊट झाला. व्ही. व्ही. एस. लक्ष्मणही ३१ रन्स केल्या. तर विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तो ४४ रन्सवर बाद झाला.
'द वॉल' राहुल द्रविड ९ रन्सवर आऊट होवून दुसरा धक्का बसला. वीरेंद्र सेहवाग शून्यावर हिलफेन्हाऊसनं पॉन्टिंगकरवी कॅच आऊट केलं. त्यानंतर गौमत गंभीर आणि राहुल द्रविडनं भारताला सुरुवातीला मिळालेल्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ९ रन्सवर द्रविडला बोल्ड करत सिडलनं भारताला दुसरा धक्का दिला. या कसोटीसाठी टीम इंडियात एक बदल करण्यात आला होता. आर. अश्वीनऐवजी विनयकुमारला संधी देण्यात आली आहे. मात्र, विनयकुमारने या संधीचे सोने केले नाही.
टीम इंडियाची पुन्हा निराशजनक कामगिरी झाली. गौतम गंभीरने २५ रन्सवर विकेट टाकली. इंडिया,-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात आज ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.