दिल्ली डेअरडेव्हिल्सची मुंबईवर मात

आयपीएलच्या आजच्या सामन्यात दिली डेअरडेव्हिल्सने मुंबई इंडियन्सचा ३७ धावांनी पराभव केला आहे. मुंबईची सुरूवात रडत खडतच झाली होती. १९ रन्सवरच मुंबईने ३ महत्तवाच्या विकेट्स गमावल्या होत्या.

Updated: Apr 28, 2012, 12:03 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

आयपीएलच्या आजच्या सामन्यात दिली डेअरडेव्हिल्सने मुंबई इंडियन्सचा ३७ धावांनी पराभव केला आहे. मुंबईची सुरूवात रडत खडतच झाली होती. १९ रन्सवरच मुंबईने ३ महत्तवाच्या विकेट्स गमावल्या होत्या. ओंबत्ती रायडूने सर्वाधिक ६२ धावा काढल्या. तर दिनेश कार्तिकने ४० रन्स काढल्या.

 

दिल्लीच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत मुंबईसमोर २०८ धावांचे आव्हान उभे केले होते. कर्णधार सेहवागच्या तडाकेबंद ७३ आणि जयवर्धनेच्या ५५ धावांच्या मदतीने दिल्लीने मुंबईसमोर हा धावांचा डोंगर उभा केला होता.

 

मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  आयपीएलच्या या पाचव्या सिजनमध्ये दिल्ली आणि मुंबईने ऐकूण ७-७ सामने खेळले आहेत. त्यात दिल्लीने ५ तर मुंबईला ४ सामन्यात विजय मिळविला आहे.

Tags: