द्रविड-युवराज; खेळातले 'बॉस'

‘द वॉल’ राहुल द्रवीडचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसाठी तर २०११ च्या वर्ल्डकपमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या युवराज सिंगचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्याचा निर्णय क्रिकेट नियामक मंडळानं घेतलाय.

Updated: Jul 7, 2012, 04:27 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

‘द वॉल’ राहुल द्रविडचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसाठी तर २०११ च्या वर्ल्डकपमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या युवराज सिंगचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्याचा निर्णय क्रिकेट नियामक मंडळानं घेतलाय.

 

बीसीसीआयचे सीएओ रत्नाकर शेट्टी यांनी पत्रकारांशी याबद्दल माहिती दिली. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी आम्ही राहुल द्रविडच्या नावाची शिफारस करत आहोत. तसंच पुढच्या आठवड्यात अर्जुन पुरस्कारासाठी युवीचं नाव सुचवण्यात येणार असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलंय. या पुरस्कारांसाठी अर्ज पाठविण्याची तारिख सरकारनं २० जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे.

 

३९ वर्षीय द्रविडनं आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलीय. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टेस्ट सिरीजमध्ये त्यानं आपल्या कारकिर्दीत टेस्ट आणि वन डे क्रिकेटमधला २३,००० रन्सचा टप्पा पार केलाय. खेळ क्षेत्रातला हा पुरस्कार द्रविडला मिळाल्यास, सचिन तेंडुलकर (११९७-९८) आणि महेंद्रसिंग धोनी (२००७-०८) नंतर हा पुरस्कार पटकावणारा तो तिसरा क्रिकेटर ठरेल. तर, नुकताच कॅन्सरसारख्या दुर्धर रोगातून बाहेर पडून आगामी टी-२०चीसाठी प्रॅक्टीस सुरू करणाऱ्या युवराज सिंग हा २०११ मधल्या वर्ल्डकपचा हिरो ठरला होता. आत्तापर्यंत वेगवेगळ्या खेळामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या २० खेळाडूंना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.