बांग्लाला पाकिस्तानने २१ रनने हरविले.

एशिया कपच्या पहिल्या वन-डे मध्ये पाकिस्तानने ठेवलेल्या २६३ रन्सचा पाठलाग करताना बांग्लादेशने चांगली सुरवात केली आहे. त्यांनी २२ ओव्हरमध्ये ९५ रन केले असून २ विकेट गमावल्या आहेत. त्यामुळे ही मॅच जिंकण्यासाठी बांग्लादेश नक्कीच प्रयत्न करेल.

Updated: Mar 11, 2012, 10:15 PM IST

www.24taas.com, मीरपूर  

 

एशिया कपच्या पहिल्या वन-डेमध्ये पाकिस्तानने बांग्लादेशवर २१ रनने विजय मिळवला आहे. पण पाकिस्तानला हा विजय सहजासहजी मिळालेला नाही, बांग्लादेशी बॅट्समनने चांगली कडवी झुंज दिल्याने सामान्यात चुरस निर्माण झाली होती, मात्र तळाच्या फलंदाजाना झटपट आऊट केल्याने पाकिस्तानला विजय मिळविता आला.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

शाकिब-अल-हसन याने ६४ रन करून सामाना आपल्याकडे वळविण्याच्या प्रयत्न केला पण नासिर हुसैन ४७ रनवर आऊट झाल्यानंतर बाकी बॅट्समन देखील लवकरच परतल्याने बांग्लादेशला पराभवाचे तोंड पाहावे लागले. पाकिस्तानकडून सर्वाधिक उमर गुलने ३ विकेट घेतल्या, तर ऐन मोक्याच्या वेळी त्याने २५ बॉलमध्ये ३९ रन केल्याने सामन्याचा शिल्पकार देखील तोच ठरला आहे.

 

एशिया कपच्या पहिल्या वन-डे मध्ये पाकिस्तानने ठेवलेल्या २६३ रन्सचा पाठलाग करताना बांग्लादेशने चांगली सुरवात केली होती. शेर - ए - बांग्ला नॅशनल स्टेडियमवर एशिया कपच्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये पाकिस्तानने बांग्लादेशसमोर २६३ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. बांग्लादेशने प्रथम टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटींगसाठी निमंत्रित केलं.

 

पाकिस्तानी टीमने ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून २६२ रनपर्यंत मजल मारली. ओपनर मोहम्मद हफीज आणि नासिर जमशेद यांनी टीमला चांगली सुरवात करून दिली त्यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ रनची भागीदारी केली. जमशेदने ५४ रन केले तर हाफिजने ८९ रनची खेळी केली,

 

हाफीज आणि जमशेद या दोंघानी केलेली चांगली सुरवात मात्र पाकिस्तानी टीमला पुढे टिकवता आली नाही. बाकी सगळे बॅट्समन फक्त हजेरी लावण्याचे काम करून गेले. त्यामुळे इतर कोणतेच बॅट्समन जास्त चमक दाखवू शकले नाही. पण शेवटच्या काही ओव्हरमध्ये उमर गुलने झटपट ३९ रन केल्याने पाकिस्तान २६३ पर्यंत मजल मारू शकली.

 

युनिस खान १२, उमर अकमल २१, असद शफीक चार, कप्तान मिस्बाह उल हक आठ, पूर्व कप्तान शहिद अफरीदी शून्य आणि सरफराज अहमदने १९ रन केले. बांग्लादेशकडून शहादत हुसैनने चांगली कामगिरी केली, त्याने पाकिस्तानच्या तीन विकेट घेतल्या, अल हसनने दोन, मुर्तजा आणि रज्जाक यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या.

 

पाचवेळा आशिया कपवर नाव कोरणाऱ्या इंडियन टीमची १३ मार्चला पहिली मॅच श्रीलंकेसोबत असणार आहे. तर पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या इंडिया - पाकिस्तान यांच्यात १८ मार्चला वन-डे मॅच होणार आहे.

 

 

पाकिस्तान : 262/8 (ओव्हर 50.0)

बांग्लादेश : 241/10 (ओव्हर 48.1)