भारत पुन्हा आघाडी प्रस्थापित करणार?

श्रीलंकेविरूद्ध दुसरी वन-डे गमावल्यानंतर आज होणाऱ्या तिसऱ्या वन-डेमध्ये विनिंग ट्रॅकवर परतण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणाऱ्या तिसऱ्या वन-डेमध्ये भारतीय बॅट्समनला चांगली कामगिरी करावी लागेल.

Updated: Jul 28, 2012, 11:19 AM IST

www.24taas.com, कोलंबो

श्रीलंकेविरूद्ध दुसरी वन-डे गमावल्यानंतर आज होणाऱ्या तिसऱ्या वन-डेमध्ये विनिंग ट्रॅकवर परतण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.  प्रेमदासा स्टेडियमवर रंगणाऱ्या तिसऱ्या वन-डेमध्ये भारतीय बॅट्समनला चांगली कामगिरी करावी लागेल.

दरम्यान, दोन्ही वन-डेमध्ये फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्माच्या जागी मनोज तिवारी याचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. तर दुखापतग्रस्त प्रग्यान ओझाच्या जागी राहुल शर्माला टीममध्ये संधी मिळते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान लंकेचा ओपनिंग बॅट्समन तिलकरत्ने दिलशान आणि उपुल थरंगा यांना रोखण्याच आव्हान भारतीय बॉलर्ससमोर असणार आहे. पाच वन-डेच्या सीरिजमध्ये सध्या भारत आणि श्रीलंका १-१ ने बरोबरीत आहेत.