माझ्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ विजय- धोनी

भारताने श्रीलंकेविरुद्ध मिळविला ऐतिहासिक विजय हा माझ्या कर्णधाराच्या कारर्किदीतील सर्वश्रेष्ठ विजय असल्याचे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे. भारताने होबार्ट वन डे मध्ये श्रीलंकेचा सात गडी आणि ८६ चेंडून राखून दणदणीत पराभव केला. भारताने श्रीलंकेचे ३२१ धावांचे आव्हान ३६ षटक आणि ४ चेंडूत पार केले.

Updated: Feb 28, 2012, 07:54 PM IST

www.24taas.com, होबार्ट

भारताने श्रीलंकेविरुद्ध मिळविला ऐतिहासिक विजय हा माझ्या कर्णधाराच्या कारर्किदीतील सर्वश्रेष्ठ विजय असल्याचे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे. भारताने होबार्ट वन डे मध्ये श्रीलंकेचा सात गडी आणि ८६ चेंडून राखून दणदणीत पराभव केला. भारताने श्रीलंकेचे ३२१ धावांचे आव्हान ३६ षटक आणि ४ चेंडूत पार केले.

धोनी म्हणाला, आम्ही जेव्हा या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरलो तेव्हा आमच्या बाजूने सर्व चांगल्या गोष्टी घडत होत्या.  ४० षटकांत ३२१ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात महत्त्वाची होती. तशीच सुरूवात सचिन आणि वीरेंद्र सेहवागने करून दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्हांला झटपट रन्स आणि चांगली फलंदाजीचीही गरजेची असते.

आम्ही पहिल्या दहा षटकांत ९० धावा केल्या होत्या. त्यामुळेच आम्ही त्यात सातत्य राखू शकलो. यात सचिन, सेहवाग आणि गंभीरचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यानंतर विराटने केलेल्या फलंदाजीमुळे आम्हांला विजयश्री मिळाल्याचेही धोनीने सांगितले.

आता आमचे लक्ष श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याकडे आहे. आम्हांला खात्री आहे, की आम्ही फायनलमध्ये धडक मारू. पुढील दोन दिवसात आम्ही खेरदी करणार आहोत आणि काही काळ प्रॅक्टीस करणार आहोत, असेही धोनीने सांगितले.