मीरपूर वनडेत भारताची विजयी सलामी

बांग्लादेशमध्ये मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला येथे इंडिया वि. श्रीलंका वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने सुरवात अतिशय चांगली केली.

Updated: Mar 13, 2012, 09:23 PM IST

www.24taas.com, मीरपूर

 

भारताने श्रीलंकेवर ५० रन्सनी मात केली. एशिया कपमध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. गौतम गंभीर आणि विराट कोहलींच्या शतकांच्या जोरावर भारताने ३०४ रन्सचं तगडं आव्हान श्रीलंकेसमोर ठेवलं होतं. पण लंकेला ते पेलता आलं नाही आणि २५४ रन्सवर त्यांचा डाव गडगडला. इरफान पठानने चार विकेट तर आश्विन आणि विनय कुमार या दोघांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. 


अश्विनने कुमार संघकाराला रविंद्र जडेजाच्या करवी झेलबाद केले. त्याने ८७ चेंडूत ६५ धावा केल्या. तर तिरीमानेला अश्विनने पायचित केले. त्याने ३७ चेंडूत २७ धावा केल्या.

 

यापूर्वी २६ षटकांपर्यंत जवळपास सहाच्या सरासरीने तीन गडींच्या मोबदल्यात १४९ धावा केल्या होत्या. सुरूवातीला तिलकरत्ने दिलशान आणि  ५९ चेंडूत ७८ धावा करणाऱ्या जयवर्धनेला बाद केले. तर आर अश्विने चंदीमलला त्रिफळाचित केले. चंदीमलने २२ चेंडूत १३ धावा केल्या.

 

 

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पहिल्या पाच ओव्हरमध्ये ३१ रन हे जयवर्धने आणि दिलशान यांनी केले, मात्र स्फोटक दिलशान फार मोठी खेळी शकला नाही त्याला इरफान पठाणने स्वस्तात आऊट केले. त्याने ९ बॉलमध्ये फक्त ७ रन केले.

 

मीरपूर वन-डे मध्ये भारताने श्रीलंकेसमोर ३०५ रनचं आव्हान ठेवलं आहे. धोनीने २६ बॉलमध्ये धडाकेबाज ४६ रन केले तर रैनाने १७ बॉलमध्ये ३० रनची तुफानी खेळी केली, त्यामुळे श्रीलंकेसमोर तगडं आव्हान ठेवता आलं आहे. कोहली आणि गंभीर यांनी शतकी खेळी करून आपली जबाबदारी चोख बजावली, पण त्यानंतर दोघही आऊट झाले.

 

गंभीर आणि कोहली यांच्यानंतर रैना आणि कॅप्टन महेंद्रसिंह यांनी धुवाँधार फटकेबाजी केली. शेवटच्या काही ओव्हरमध्ये या दोघांनी चौफर फटकेबाजी केली, त्याचसोबत धोनीने पुन्हा एकदा चतुरपणे स्वत:ला वर बढती दिली. तर रैनाने देखील चांगली फटकेबाजी केली.

मीरपूर येथे सुरू असलेल्या इंडिया वि. श्रीलंका वन-डे मध्ये कोहली आणि गंभीर यांनी शानदार शतक झळकावले आहे. सुरवातीला सचिन झटपट आऊट झाल्यानंतर गंभीरच्या सोबतीला आलेल्या कोहलीने सुरेख खेळ केला, आणि या दोघांनी २००ची पार्टंरनशीप केली.

 

गंभीरने ११८ बॉलमध्ये १०० रन केले त्यात सात फोरचा समावेश होता, तर कोहली १२० बॉलमध्ये १०८ रन केले. या दोघांनी सुरवातीला संयमी खेळ  केला मात्र नंतर आक्रमक खेळ करत भारताचा स्कोअर दोनशेच्या पार नेला. पण शतक झाल्यानंतर दोघही झटपट आऊट झाले. गंभीर आणि कोहली दोघांना महारूफने आऊट केले.

 

बांग्लादेशमध्ये मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला येथे इंडिया वि. श्रीलंका वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने सुरवात अतिशय चांगली केली. भारतीय ओपनर जोडीला फटकेबाजी करण्याची संधीच त्यांनी दिली नाही. कुलशेखरा आणि लकमल यांनी गंभीर आणि सचिनला चांगले स्पेल टाकले. त्यातच सचिनवर असलेल्या महाशतकाचा दबाव, आणि याच दबावाखाली सचिन असल्याचे दिसून आला. आणि त्यातच त्याने आपली विकेट गमावली. सचिनला 6 रनवर लकमलने आऊट केले.

 

सचिन आऊट झाल्याने भारताची सुरवात खराब झाली, त्यानंतर आलेल्या कोहलीने संथ सुरवात केली आणि गंभीरने स्कोअर बोर्ड सतत हलता ठेवला. या दोघांनी भारताची जास्त पडझड होऊ दिली नाही. त्यातच गंभीरने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. गंभीरने 58 रन केले आहेत.

 

तर फॉर्मात असणारा कोहली देखील आता अर्धशतकाचा जवळ पोहचला आहे. 23 ओव्हरपर्यंत भार