युवराजसाठी मुंबईत मातीची इमारत

भारताचा धडाकेबाज फलंदाज युवी. अर्थात सगळ्यांचा लाडका युवराज सिंग. या युवीला शुभेच्छा देण्यासाठी एक सरप्राईज भेट देण्याचं ठरलं आहे. ही सरप्राईज गिफ्ट आहे, मातीची इमारत.

Updated: Feb 9, 2012, 04:48 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

भारताचा धडाकेबाज फलंदाज युवी. अर्थात सगळ्यांचा लाडका युवराज सिंग. या युवीला शुभेच्छा देण्यासाठी एक सरप्राईज भेट देण्याचं ठरलं आहे. ही सरप्राईज गिफ्ट आहे, मातीची इमारत.

 

 

मुंबईतल्या हाय स्ट्रीट फिनिक्स भागात ही मातीपासून बनवलेली इमारत आपल्या सगळ्यांच्या लाडका असणाऱ्या युवीसाठी बनवण्यात आली आहे.  ही इमारत तयार केलीये ब्रिटनचे एक शिल्पकार सायमन स्मिथ यांनी. जे स्वतः गेल्या १७ वर्षांपासून कॅन्सरशी लढतायत. जेव्हापासून टीम इंडियाचा धडाकेबाज बॉलर युवीला कॅन्सर झाल्याचं कळलय तेव्हापासून त्याचे फॅन्स त्याच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना करतायत.

 

 

जर एखाद्यात इच्छाशक्ती असेल तर कुठलही संकट त्यापुढे टीकत नाही, अशी युवीला प्रेरणा  मिळावी म्हणून शिल्पकार सायमन यांनी मुंबईत येऊन ही मातीची इमारत तयार केली आहे. सायमन  आता कॅन्सरविषयी जगभर फिरून जनजागृतीही करणार आहेत. या आगळ्यावेगळ्या कल्पनेनं युवी भारवला नाही तर नवलंच. आता ही इमारत बघण्यासाठी युवीच्या चाहत्यांना ओढ लागली आहे ती मुंबईची.

 

[jwplayer mediaid="44709"]