विराट कोहलीवर फॅन्स फिदा

आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर टीम इंडियात अढळ स्थान मिळवणारा विराट कोहली हा भारतीय फॅन्सच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मीरपूरमध्ये झालेल्या पाकिस्तानविरूद्ध अटीतटीच्या मॅचमध्ये तर आपल्या विस्फोटक सेंच्युरीमुळे विराट प्रतिस्पर्ध्यांकरता डोकेदुखी आणि टीम इंडियासाठी संकटमोचक ठरलाय आहे. त्याच्या याच अफाट खेळीमुळे भारताच्या एशिया कपची फायनल गाठण्याच्या आशा जिवंत आहेत.

Updated: Mar 20, 2012, 08:55 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर टीम इंडियात अढळ स्थान मिळवणारा विराट कोहली हा भारतीय फॅन्सच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मीरपूरमध्ये झालेल्या पाकिस्तानविरूद्ध अटीतटीच्या मॅचमध्ये तर आपल्या विस्फोटक सेंच्युरीमुळे विराट प्रतिस्पर्ध्यांकरता डोकेदुखी आणि टीम इंडियासाठी संकटमोचक ठरलाय आहे. त्याच्या याच अफाट खेळीमुळे भारताच्या एशिया कपची फायनल गाठण्याच्या आशा जिवंत आहेत.

 

 

विराट कोहलीच्या रूपात टीम इंडियाला नवा स्टार लाभला आहे. आपल्या दैदीप्यमान खेळीने त्याने टीम इंडियाला अनेक विजय एकहाती मिळवून दिलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना लागणारा ऍटीट्यूड आणि ऍग्रेशन यांचा सुंदर मिलाफ म्हणजे विराट कोहली. विराटने आतापर्यंत ८५ वन-डेमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करताना ११ सेंच्युरी झळकावल्या आहेत. यांतील १०  सेंच्युरीमध्ये भारताने विजय मिळवला आहे. कोहलीने करिअरमध्ये झळकावलेल्या ११ सेंच्युरींपैकी ७ सेंच्युरी या प्रतिस्पर्धी टीमने दिलेल्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग करताना झाल्या आहेत.

 

 

विराट कोहलीच्या भन्नाट खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताचा हा विजय ऐतिहासिक विजय आहे. आजवर धावांचा पाठलाग करताना भारताने मिळविलेला ही विजय सगळ्यात मोठा विजय आहे. यात विराट कोहलीचा वाटा हा देखील विराटच होता. त्याने फक्त १४८ बॉलमध्ये १८३ रनची तुफानी खेळी केली. त्यात तब्बल २२ फोर आणि १ सिक्सचा समावेश आहे. विराटचा ही आजवरची सर्वोच्च खेळी ठरली आहे. विराटने या वर्षाच्या सुरवातीलाच ३ शतकं केली आहेत. त्यामुळे विराट हा खऱ्या अर्थाने मॅचविनर ठरत आहे.

 

 

 

विराट कोहलीने पुन्हा एकदा आपणच ‘दी बेस्ट’ असल्याचे दाखवून दिलं आहे. सातत्य काय असतं याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणज विराट कोहली. विराटने पाकिस्तान विरूद्ध दमदार शतक ठोकलं आहे. त्यामुळे विराटचं हे वन-डे मधील ११वं शतकं आहे. तर एशिया कपमधील हे दुसरं शतक त्याने केले आहे. गंभीर झटपट आऊट झाल्यानंतर सचिनच्या साथीला आलेल्या विराटने खेळाची सुत्र आपल्याकडे घेतली आणि दणदणीत शतक देखील ठोकलं. निवडसमितीने विराटला उपकप्तान पद दिले. विराटनेही निवडसमितीचा विश्वास सार्थ ठरवला. पण शतक झाले असले तरी त्याने भारताला मॅच जिंकून देणंही तितकच महत्त्वाचं आहे. अशा या लाडक्या विराटवर फॅन्स फिदा झाले नाहीतर नवल.

 

आणखी संबंधित बातमी 

 

पाक बुरा न मानो कोहली है- पूनम पांडे

 

फोटो पाहा...

खेळी विराटची ठरली ‘विराट’