सचिनने मनोचिकित्सकाकडे जावे- लतिफ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपल्या महाशतकाची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे त्याच्यावर मानसिक दडपण निर्माण होत आहे, त्यामुळे त्याने मनोचिकित्सकाकडून सल्ला घ्यावा, असा फुकटचा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफ याने दिला आहे.

Updated: Jan 9, 2012, 04:28 PM IST

www.24taas.com,कराची
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपल्या महाशतकाची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे त्याच्यावर मानसिक दडपण निर्माण होत आहे, त्यामुळे त्याने मनोचिकित्सकाकडून सल्ला घ्यावा, असा फुकटचा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफ याने दिला आहे.

सचिन तेंडुलकरवर दबाव असल्याबाबत दुमत नाही, सचिनने याबाबतीत नकार जरी दिला असला तरी महाशतक ही खूप मोठी गोष्ट आहे. या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी त्यावर दबाव असेलच. त्याने जर क्रीडा मनोचिकित्सककडे याबाबत सल्लामसलत केली, तर ते त्याच्या भल्याचे असले, असे लतिफ याने तारे तोडले आहे. सचिनच्या मनात महाशतकाने घर केले आहे, त्यासाठी त्याच्यावर दबाव आहे. या दबावातून त्याने सुटका करून घेतल्यास त्याची महाशतकाची प्रतिक्षा संपेल, असेही लतिफ याने सांगितले.

तेंडुलकरला गेल्या २१ आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये महाशतकाने हुलकावणी दिली आहे. परंतु, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत त्याला शतकाला गवसणी घालण्यास यश मिळेल. जगातील सर्वोच्च स्थानावर असलेल्या खेळाडूंना मानसिक दबावातून बाहर पडण्यासाठी अशा प्रकारचा सल्लाची गरज पडल्याचेही लतिफ याने नमूद केले.