www.24taas.com, मुंबई
एशिया कपसाठी आज टीम इंडिया जाहीर करण्यात आली. वीरेंद्र सेहवाग, जहीर खान आणि उमेश यादव यांना विश्रांतीच्या नावाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरी करणाऱ्या सेहवागच्या जागी विराट कोहलीला उपकर्णधार पद बहाल करण्यात आले आहे.
'सेहवागला टीम बाहेर का ठेवण्यात आलं आहे याचं कारण काय'? या प्रश्नावर श्रीकांत यांच्या पारा फारच चढला. त्यांनी म्हटलं की, आम्ही सरळ गोष्टी करीत असतो. आणि तसेच ऐकणंही पसंत करीत असतो. त्यामुळे जर का आपण मला गुगली टाकून बोलणार असाल तर मला फार राग येईल. सेहवागला बाहेर केलेलं नाही. फिटनेसमुळेच सेहवागला टीममध्ये स्थान देता आलेलं नाहीये. आणि त्यामुळेच कोहलीला उप कर्णधार बनविण्यात आलं आहे. पण ज्या पद्धतीने श्रीकांत यांना राग अनावर झाला, त्यावरून सेहवाग न खेळवण्याबाबत नक्कीच काही तरी कारण आहे असे दिसते.
निवड समितीचे अध्यक्ष मीडियाशी संवाद साधताना म्हटंल की, आमच्या मते फिटनेसचा विचार करता आम्ही एशिया कपसाठी उत्तम अशा टीमची निवड केलेली आहे. पण जहीर आणि सेहवाग यांना दुर्दैवीपणे बाहेर बसावे लागत आहे, त्याचे कारण म्हणजे त्यांची दुखापत होय. तर सचिन तेंडुलकरवर निवडसमितीने पूर्णपणे विश्वास दाखवला आहे. आणि त्यामुळे सचिनची एशिया कपसाठी वर्णी लागली आहे. तसचं टीम इंडियाची धुरा महेंद्रसिहं धोनी हाच संभाळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पण संधी न मिळालेल्या मनोज तिवारीला संघात स्थान मिळाले आहे.